कोरोना इम्पॅक्ट..! नाशिक जिल्ह्यातील या मंदिरांत मास्क सक्ती

नाशिक : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे भारतात सतर्कता बाळगली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गडावर आणि त्र्यंबकेश्वर पुन्हा मास्क वापरण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून आव्हान करण्यात येते आहे. सप्तशृंगी गडासह त्र्यंबकेश्वरच्या देवस्थानावर देखील मास्क वापरण्याचे आवाहन आले आहे. सप्तशृंगी गड आणि त्र्यंबक येथे येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावे तसेच लवकरच मास्क सक्ती करण्याchi इशारा देखील दिला आहे.

चीनसह पाच देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून हे पाऊले उचलली जात आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी त्यासोबत त्र्यंबकेश्वर या देवस्थानावर हजारो भाविक गर्दी करत असतात. ही गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनसह जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतात देखील वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे आणि त्याच अनुषंगाने वणी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानावर हे निर्णय घेण्यात आले आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेने जगातील सगळेच देश पुन्हा सतर्क झाले आहेत. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी याबाबत आढावा घेत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. सध्या तरी मास्क घालणे बंधनकारक नाही परंतु शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मस्कचा वापर करावा असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी अनेक गर्दी होणाऱ्या ठिकाणी मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
यातच आता मास्क सक्ती नाशिक जिल्ह्यात होणार असल्याचे चिन्ह आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आणि आद्यपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी गडावर मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात येणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेता ही मास्क सक्ती करण्यात येत आहे. दररोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वर महादेवाचे आणि वणीच्या देवीचे दर्शन करण्यासाठी येत असतात. त्यातच आता नाताळाच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षामुळे भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही मास्क सक्ती करण्यात येणार आहे. शनिवार पासून ही मास्क सक्ती लागू होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या एका वर्षापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण घटले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोना थैमान घालत आहे. सध्या भारतात कोरोनाचे फारसे रुग्ण नाहीत मृत्युसंखाही जास्त नाही मात्र हा विषाणू पुन्हा पसरत असल्याने भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता राज्य सरकार कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करणार आहे. नाशिक जिल्ह्यातही ती सतर्कता दिसून येत आहे.