Home » सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील समस्यांवर झालेल्या बैठकीत दादा भुसे आक्रमक

सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील समस्यांवर झालेल्या बैठकीत दादा भुसे आक्रमक

by नाशिक तक
0 comment

नाशिक : सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील समस्यांवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत (Meeting on problems in border areas of Surgana) गोंधळ पाहायला मिळाला. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील ग्रामस्थांनी आंदोलन मागे न घेतल्याने हा गोंधळ उडाला. त्यामुळे अखेर पालकमंत्री यांनी राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार (NCP MLA Nitin Pawar) यांना सुनावले. ‘हे बरोबर नाही’ या शब्दात दादा भुसे यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे लेटर हेड दाखवत दादा भुसे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

चिंतामण गावित राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्याचं दादा भुसे यांनी पत्र दाखवलं. मात्र राष्ट्रवादी पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही असं स्पष्टीकरण गावित यांनी दिलं. या मागणीला पक्षाचा पाठींबा असल्याच्या प्रश्नावर गावित यांनी नकार दिला. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे लेटर हेड दाखवत ‘हे बरोबर नाही, दोन तासांपासून सुरु असलेल्या बैठकीत मी हे समोर आणले नाही. मी पक्षांचे विषय मध्ये आणले नाही. कारण राजकारणाच्या पलीकडे त्या गोरगरीब आदिवासी बांधवांचे दुख आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. जे ७५ वर्षांमध्ये झाले नाही ते ७५ तासांत, ७५ मिनिटांत झाले पाहिजे का?’ असं म्हणत दादा भुसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दादा भुसे आक्रमक होताच गावितांसह शिष्टमंडळ नरमल्याचे दिसून आले. तर शिष्टमंडळाच्या दबावानंतर गावित यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

दादा भुसे का चिडले; पहा व्हिडिओ

सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील समस्यावर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत झाली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. बैठकीनंतर आश्वासन देऊनही चिंतामण गावित यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली. दरम्यान आक्रमक होत दादा भुसे यांनी चिंतामण गावित हे राष्ट्रवादीचे नेते असून राष्ट्रवादीचे लेटर हेड दाखवले. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय वळण तर नाही असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच गोंधळ निर्माण झाला. अखेर या आंदोलनासाठी गठीत करण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या दबावाखाली गावित यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. पत्रकार परिषद झाल्यानंतरही या ठिकाणी एक ट्विस्ट पाहायला मिळाला. ५५ गाव गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत असताना यातीलच काही गावकऱ्यांनी मात्र ‘आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे’ असे निवेदन पालकमंत्र्यांना दिले. हे सर्व पाहता आंदोलन मागे जारी घेण्यात आलं असलं तरी कुठेतरी या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असल्याचं दिसून आलं.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!