पोलिस मारहाणीत मृत्यू प्रकरण;पोलीस उपमहानिरीक्षकानी नोंदवला जबाब

सहा वर्षांपूर्वी यवतमाळमधील अवधुतवाडी पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज (मंगळवार) यवतमाळ येथे दाखल झाले आहेत.

२०१५ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात अवधूतवाडी पोलिसांनी विजय घुटके याला अटक केली होती. २५ जून २०१५ ला रोजी एका डॉक्टरच्या घरी चोरी झाली होती त्या प्रकरणात घुटकेला अटक केली होती . कारागृहातून बाहेर आल्यावर ९ जुलै ला त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत विजयचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी करत राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे तक्रार केली. याच तक्रारीवरून आयोगाने चौकशी समिती गठीत केली. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विजय घुटके याचा मृत्यू झाला त्या वेळी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांना आज उपमहानिरीक्षकांनी चौकशीसाठी बोलावले होते प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करत जबाब नोंदवला