दारू बंदी असलेल्या गुजरातमध्ये दारू मुळे एक खळबळ जनक प्रकार घडला आहे . विषारी दारू नागरिकांच्या जीवावर उठली आहे. अहमदाबाद बोटाद येथे विषारी दारू सेवन केल्याने रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे , तर 40 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे . त्यामुळे मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दारू बंदी असलेल्या ठिकाणी दारू आली कुठून आणि कशी मिळाली यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत .
बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात विषारी दारु सेवन केल्याने सर्वाधिक 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या बरोबरच अलावा उंचडी, चंदरवा, आकरू आणि अनिवारी या गावांतही मृत्यू होणाऱ्यांची संख्या आहे . विषारी दारूने दोन दिवसांत 15 जणांचा बळी घेतला आहे. अनेकांची प्रकृतीहि चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तारी रोजिदलगतच्या नभोई गावात जाऊन या नागरिकांनी मद्यपान केले होते. सोमवारी सकाळी सर्वांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आणखी 6 जणांचा काही वेळाच्या अंतराने मृत्यू झाला. पाहाता पाहाता मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे.
बोटाद जिल्ह्यातील तीन मद्य तस्कारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गुजरातचे पोलिस महासंचालक आशीष भाटिया यांनी दिली आहे .आरोपी दारुची तस्करीकरून ग्रामीण भागात त्याची विक्री करत होते. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी धरपकट सुरू केली आहे. पोलिसांची अनेक पथके नभोई गावातील दारू विक्रेत्यांचा शोध घेत आहेत. गावात दारूचे सेवन करणाऱ्यांचीही ओळख पटवली जात आहे. मात्र, नभोईत अद्याप एकही रुग्ण आढळला नाही.