BY-REVATI WALZADE
नाशिक- निफाड पिंपळगाव मार्केट जवळील रस्त्या वरून एकाच ट्रैक्टर ला दोन ट्रॉली जोडून ऊस वाहून नेताना ट्रैक्टरची धडक लागल्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आधी दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अपघात झाल्यामुळे परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
सूर्यभान गोपाळा पवार असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाच नाव आहे. सध्या ऊसतोडीचे कामे मोठ्या जोमात चालू असताना ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे निफाड पिंपळगाव, निफाड नाशिक, निफाड येवला मार्गावरून ऊस वाहतूक चालू आहे. दरम्यान एकाच ट्रैक्टरला दोन ट्रॉली लावून नेण्याचे प्रकार सर्परासपणे चालू आहे. याच प्रकारा मुळे वृद्धाला आपले प्राण गमवावे लागले. एका ट्रॉली मध्ये कमीत कमी 10- 12 टन ऊस वाहून नेण्यात येत आहे. एकूण २२ टन ऊस एका वेळेस वाहून नेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
निफाड- पिंपळगाव मार्गावरील जुना सरकारी दवाखाना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजार भरतो व शुक्रवारी पिंपळगाव मधील आठवडा बाजार असतो. व याच रस्त्यावरून ऊस वाहून नेण्याचे काम सुरु असते. त्यातल्या त्यात एकाच ट्रैक्टर ला दोन ट्रॉली लावून ऊस वाहतुकी मुळे माघून येणाऱ्या गाड्यांना ट्रैक्टर ला ओव्हर टेक करणे अवघड होते. व समोरून येणारे वाहनेही दिसत नाही. या सर्व परिस्थिती चा विचार करता कमीत कमी शुक्रवारी आठवडा बाजाराच्या दिवशी तरी ऊसवाहतूक बंद ठेवावी अशी मागणी परीसातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे. दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊसवाहतूकीचे काम चालू आहे. अश्यात एकाच ट्रैक्टर ला दोन ट्रॉली लावून ऊस वाहतुकीचा जुगाड रोखण्याचा प्रश्न समोर अला आहे.
त्या सोबतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे देखील आहे.अश्याच रस्त्यावरून वाहतूक सुरु असते भविष्यात काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न ही नागरिकांनी उपस्थित केलाय.