Home » स्कूल व्हॅनमधून उतरून घरात जाणार त्या आधीची चिमुकलीला मृत्यूने कवटाळले

स्कूल व्हॅनमधून उतरून घरात जाणार त्या आधीची चिमुकलीला मृत्यूने कवटाळले

by नाशिक तक
0 comment

नाशिक : शाळेतून घरी परतलेल्या चिमुरडीवर घरात जात असतानाच काळाने झडप घेतली. अत्यंद दुर्दैवी अशी ही घटना जेलरोड पवारवाडी येथे घडली आहे. स्कूल व्हॅनच्या धडकेत ८ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अपेक्षा नवज्योत भालेराव राहणार पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटी समोर, जेलरोड, नाशिकरोड हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरून व्हॅनच्या पाठीमागून घरात जात असताना व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली. त्यामुळे मागच्या टायरात सापडून अपेक्षला गंभीर दुखापत झाली.

तिला औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की नवीन मराठी या शाळेची स्कूल व्हॅन अपेक्षा हिला घरी सोडवण्यासाठी आली होती स्कूल व्हॅन मधून अपेक्षा खाली उतरून यांच्या पाठीमागून घरात जात असताना व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली त्यावेळी मागच्या टायरात सापडून अपेक्षाला गंभीर दुखापत झाली. यावेळी तिला तात्काळ जखमी अवस्थेत औषध उपचारासाठी नाशिक रोड परिसरातील जयराम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले . परंतु यावेळी डॉक्टर सुनील मोकासरे यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

चिमुकली शाळेतूनच घरी आली घरी आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता ती बागडत घरात जाण्यासाठी वळली. मात्र घरात जाणार तोच तिच्यावर काळाने घाला घातला आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. शाळा सुटल्यानंतर आईच्या कुशीत विसावणाऱ्या अपेक्षाला मृत्यूच्या दाढे त कायमचं विसावं लागलं. हृदय पळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपेक्षाच्या या दुर्दैवी मृत्यूने भालेराव परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करीत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!