अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. आणि आता शिंदे – फडणवीस सरकारमध्ये कोणाला कुठले मंत्रिपद मिळते याची आता राज्यभरातील जनता वाट पाहत आहे.लांबणीवर पडलेला हा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर 20 किंव्हा 21 रोजी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याची देखील चर्चा सुरू आहे. पहिल्या टप्यात 12 ते 13 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता जवळ पास राज्यात सत्ता बदल होऊन पंधरा ते सोळा दिवस झाले आहेत. भाजपकडे 106 आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच चालू असल्याचा दिसून येतं आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांनी आतापर्यंत मुंबईत शक्ती प्रदर्शन देखील केल्याचे पाहिला मिळाले आहे.
शिंदे फडणवीस यांचा शपथविधी होऊन त्यानंतर तीन आठवडे उलटून ही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही भाजपला 29 आणि शिंदे गटाला 8 कॅबिनेट व 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची देखील चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे सरकारमधील 7 मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोरांसह 10 अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याने पावसाळी अधिवेशन देखील उशिराने होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेत येतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.