या दिवशी होणार संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान..

नाशिक : वर्षोनुवर्षे परंपरा असलेल्या संत निवृत्तीनाथ (Nivruttinath) महाराज दिंडीचे वेळापत्रक (timetable) जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर विश्वस्तांनी अपरा एकादशीच्या मुहूर्तावर जाहीर केले आहे. त्र्यंबकेश्वरची (Tryambakeshwar) पालखी ही २७ दिवसांत पंंढरपूरला पोहोचणार आहे. दिंडीच्या पायी वाटचालीत जी गावे (villages) येतात, त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठविण्यात आले आहे. संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी चांदीच्या रथासह (chariot) १३ जूनला आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे (Pandharpur) निघणार आहे. पंढरपूरात ९ जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहचेल. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४५० किलोमीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

रोज दिवसा साधारण वीस किलोमीटर पायी प्रवास केला जातो. रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपूरात पोहोचते. चार मुक्कामानंतर पंढरपूरवरून पालखी त्र्यंबकेश्वरकडे परत निघेल. १८ दिवसांचा पायी प्रवास करून ३० जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.

दोन वर्ष्यांच्या खंडानंतर यंदा ह्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने आणि ही एक प्रमुख पालखी असल्याने या पालखीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ शकणार आहे. साधारणतः महिनाभर आधी निघणाऱ्या या पालखीला रस्त्यात अनेक लहान मोठ्या पालख्या येऊन भेटत असतात. त्यामुळे या पालखीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

दोन वर्षानंतर समस्त वारकरी विठूरायाच्या भेटीला जाणार…
गेल्या दोन वर्ष्यांपासून पायी दिंडीची परंपरा कोरोना (corona) मुळे खंडित झाली होती. आता पुन्हा सर्वत्र कोरोनाचे सावट कमी होऊन राज्य शासनाने सणउत्सवांना परवानगी दिल्यानंतर, सणउत्सव पूर्वीप्रमाणे साजरे होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्ष्यांपासून त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची पालखी पायी न जाता शासनाच्या नियमानुसार महामंडळाच्या बसने संत निवृत्तीनाथांच्या पादुका ह्या काही मुख्य वारकऱ्यांसोबत रवाना व्हायच्या. त्यामुळे काही मानकऱ्यांचे दोन वर्ष्यांपासून पंढरीच्या विठूरायाचे दर्शन व्हायचे. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने समस्त वारकरी दिंडीसोबत पायी विठूरायाच्या भेटीला जातील.

निवृत्तीनाथांच्या पालखीलाही मानाचे स्थान…
त्र्यंबकेश्वर येथील संतनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला प्रमुख स्थान आहे. संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला ७२३ वर्ष झाले आहेत. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृ​त्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते, त्यामुळे ही पालखी देखील महत्वाची पालखी आहे. महाराष्ट्रभरातून ह्या पालख्या वारीच्यावेळी पंढरपूरला विठूरायाच्या भेटीला जात असतात.