चर्चेत आलेल्या त्या देवगाव आश्रम शाळेच्या तीन शिक्षिकिकांचा अपघात

नाशिक जिल्ह्यातील घोटी देवगाव रस्त्यावर चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी वाहन रस्त्याच्याकडेला उलटले यात तीन शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांना जास्त दुखापत झालेली नाही, तसेच या शिक्षिका देवगाव आश्रमशाळेत जात असताना त्यांचे चारचाकी वाहन रस्त्याच्याकडेला उलटले. या शिक्षिका त्याच देवगाव आश्रमशाळेतील आहेत जिथे मुलीला मासिकपाळीमुळे झाडे न लावू देण्याचा आरोप आहे. या अपघाताबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी ‘नाशिक तक’ च्या टीम ने प्रयत्न केला मात्र आश्रमशाळेतील अधिकाऱ्यांनीही काही महिती दिली नाही आणि आदिवासी विभागाचे अधिकारीही माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हे सर्व ही माहिती का दडवत आहेत महित नाही.

या शिक्षिका घोटी रस्त्यावरून देवगाव आश्रमशाळेत जात होत्या हे तेच देवगाव आश्रम आहे जिथे वाद झाला होता. मुलीला मासिक पाळीआल्याने तिला वृक्षारोपण करण्यास रोखण्यात आले असा आरोप आहे. घटना अशी की, आश्रम शाळेत वृक्षारोपणनाचा राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात सर्व मुलांच्या हस्ते झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या मुलीला मासिक पाळी आली होती म्हणून झाडे लावू नकोस नाहीतर ती झाडे जळतील असे शिक्षक म्हणाले, असा आरोप या मुलीने केला आहे. यानंतर या मुलीने आदिवासी विभागात तक्रार केली आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी आज आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रमशाळेत दाखल झाले आहेत.