त्यावेळेस लाज नाही वाटली का ? आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेनेतील चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेत एक गट स्थापन केला.आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे .शिवसेनेतील चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहे एक ठाकरे आणि दुसरा शिंदे गट या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप चालतच आहेत यात शिवसेना व शिवसेनेच्या चिन्हावरून ही संघर्ष चालत असल्याचे पाहायला मिळत आहे असे असले तरी एकीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे शिंदे गटातील आमदारांवर आक्रमक होऊन टीका करत आहेत . शिंदे गट ही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील आमदारांनी मुख्य शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


युतीत 2019 ला शिवसेना- भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या राज्यातील जनतेने या युतीला कौल दिला होता सेना भाजपने एकत्र सत्ता स्थापन करावी अशी भावना होती मात्र त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला लोक भावनेला पायदळी तुटवत असताना तेव्हा लाज वाटली नव्हती का असा प्रश्न गोगावले यांनी विचारत मुख्य शिवसेनेवर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिल आहे. तर पुढे गोगावले म्हणाले आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार लोक भावनेचा आदर करत सेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे, ना राजीनामा देण्याची गरज आता ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना अधिकच चुरशीचा पाहायला मिळणार असून चिन्हावरून ही शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.