मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदद देण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेवर दु:ख व्यक्त केल आहे. ही “घटना दुखद असून अशा काळात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या कुटुंबियांसोबत मी आहे” असा शोक संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. मध्यप्रदेशातून जळगावच्या अमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरून खाली नर्मदा नदीत कोसळली ह्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्य पार पडावे व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशातील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
सोबतच मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाशीही मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असून सहकार्यासाठी विनंती केली आहे. आणि मध्यप्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या
नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे कार्यवाही करावी असे निर्देश राज्य परिवहन मंडळाला दिले आहे.
मध्यप्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अमळनेर कडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. या बस मध्ये ५० ते ६० प्रवाशी होते अशी प्राथमिक महिती आहे.