मोठी बातमी..! पुन्हा गंगापूर धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग

By Pranita Borse

नाशिक: कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा नाशिकमध्ये (Nashik district) पावसानं जोर धरला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur dam) करण्यात येत असलेला विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. मात्र काल पावसाने विश्रांती दिली होती. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता. पावसाने अल्पशी विश्रांती दिल्याने ७१२८ क्युसेक इतक्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र आज पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवून तो ८८८० क्युसेक इतका करण्यात आला आहे.

धरणांतील विसर्ग

दारणा – ८८४६ क्युसेक
कडवा – २५९२ क्युसेक
गंगापूर – ८८८० क्युसेक
आळंदी – २४३ क्युसेक
होळकर ब्रिज – ७५१५ क्युसेक

जिल्ह्यात पावसाचा जोर

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यास धुवांधार पावसाने झोडपले आहे. सर्वत्र पावसाने हाहाकार केला आहे. नदी नाल्याना पूर आला आहे अनेक भागात पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भाग असलेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून आता पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे १०० मिलिमीटर का पाऊस झाला आहे तर इगतपुरी जवळील टाकेद येथे ५.० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. इगतपुरीत सर्वात जास्त पाऊस झाला आहे. घोटी येथे ५७.० मिलिमीटर इतका तर धरगाव येथे ५१.० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे . याबरोबरच वाडीवर येते २६.० मिलिमीटर नांदगाव येथे १८.० मिलिमीटर पेठ येथे ९० मिलिमीटर आणि त्र्यंबकेश्वर येथे ५५ मिलिमीटर इतक्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे.
इगतपुरी नंतर पेठ मध्ये ही चांगल्या प्रमाणात आज पाऊस झाल्याची नोंद आहे इगतपुरी ९० मिलिमीटर इतका पाऊस आज कोसळला ११ ते १४ जुलै दरम्यान नाशिकला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.