Home » शिंदे गट आणि भाजपात ‘वाईन’ वरून वाद? पहा काय आहे प्रकरण

शिंदे गट आणि भाजपात ‘वाईन’ वरून वाद? पहा काय आहे प्रकरण

by नाशिक तक
0 comment

भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मविआच्या काळात सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता तसेच मोठी आंदोलने देखील करण्यात आली होती. मात्र आता हा वाद एकदा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण या निर्णयाची अंमलबजावणी विद्यमान सरकार करण्याच्या तयारीत दिसत आहे.


मंत्री शंभुराज देसाई म्हणतात निर्णय राज्याच्या हिताचा

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई मविआच्या काळातील निर्णयाबद्दल सकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाईन विक्रिच्या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेतील. अशा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

तर मुनगंटीवार विरोधात

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मॉल आणि मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. या धोरणाचा ड्राफ्ट घेवून मी फडणवीसांना भेटून यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली वाईन विक्रीचा निर्णय बरोबर नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

वाद पेटणार?

त्यामुळे ह्या मतभेदांमुळे शिंदे गट व भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांच्या मत परस्परविरोधी असून नक्की कोणता निर्णय अमलात येणार यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याकाळी फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता. आता ते सत्तेत असताना त्यांची काय भूमिका असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!