आव्हान देऊ नका केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी केसरकर म्हणाले आहेत. आम्हाला आव्हान देऊ नका नारायण राणेंसोबत गेलेले निवडून आले आहेत.आम्हाला कोणी निवडणूक लढविण्याबाबत आव्हान देऊ नका. आमच्या नेत्यांचे अस्तित्व आहे. अस्मिता जागी झाली तर माणूस उठून उभा राहिल, तुम्ही अजून लहान आहात. ते तरुण आहेत, उद्धवसाहेब यांच्याकडून शिकावे, आम्ही आदर करतो. तुम्ही मंत्री पदावर असताना काय केले हे सांगावे,असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे .

केसरकर म्हणाले आहेत .आम्ही वेगळे होत इतर पक्षात गेलो असतो, पण शिवसेना पक्षावर आमचे प्रेम आहे. आम्ही शिवसेनेसोबत गद्दारी करु शकत नाही. आम्ही आमदारकी पणाला लावली. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही मानतो. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड केले नाही, यापूर्वी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासमोर भूमिका मांडली होती. आता यात्रा का काढतांय आधी सामान्य लोकांना भेटत होते का, असा सवाल करत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे . सध्या आदित्य ठाकरे हे राज्यात दौरा करत आहेत .

एका नेत्याने शिवसेना उभी केली असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण बाकीचे नेत्यांनी साथ दिली ही वस्तुस्थिती आहे. असे केसरकर म्हणाले असून दादा भुसे, संदीपान भुमरे हे शिवसेनेसाठी जेलमध्ये गेले का ? संदीपान भुमरे पाचवेळा आमदार झाले, पण मंत्री पदासाठी आग्रही राहीले नाही. ताठ मानेने उभे राहिले. पक्षनिष्ठेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत करणे चुकीचे आहे. असे म्हणत तुम्ही किती ही यात्रा काढा, असा टोला केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे . एकनाथ शिंदे यांनी कोणती मागणी केली नसताना त्यांची बदनामी केली जात आहे .एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, मी येतो असे उद्धव ठाकरे सांगतात. असे जर बोलत असतील तर आमच्या सारख्यांचे काही खरं नाही. असे म्हणत अनिल परब यांच्या फोनवरुन ठाकरे यांनी फोन केला. हे चेक करावे, असे केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, केसरकर यांनी शिवसंवाद यात्रेवरून देखील आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसंवाद यात्रा येणारे शिवसेनेचे आहेत हे त्यांना कोठे माहित आहे. नेमके सैनिक आहेत का राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांना केसरकर यांनी लगावला असून अडीच वर्षाने सीएम पद जाणार होते, पण आता शिंदे यांच्या रुपाने सीएम पद शिवसेनेकडेच राहीले. शिंदे यांनी केले म्हणून चुकीचं , भावनात्मक आवाहन केले जाते हे चुकीच आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड केले नाही, यापूर्वी भूमिका मांडली होती. आता यात्रा का काढतां आधी सामान्य लोकांना भेटत होते का, असा सवाल केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या राज्यभरात होणाऱ्या दौऱ्यांवरून उपस्थित केला.