दिवाळीत साईबाबांच्या झोळीत कोटींचे दान

संपूर्ण देशा सोबतच शिर्डीची सुद्धा यंदाची दिवाळी फार जोरात साजरी झाली.सुट्टीनिमित्त २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात साई भक्तांनी शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.व या काळात साइंच्या झोळीत चक्क १८ कोटींचे दान मिळाले आहे.शिर्डी मध्ये साईंच्या चरणाशी लीन होत लाखो भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. भारता बरोबरच ईतर देशांतून देखील मोठ्या प्रमाणावर दान करण्यात आलेल आहे.विशेष म्हणजे अगदी कमी वेळेत म्हणजेच १५ दिवसांच्या कलावधी मध्ये १८ कोटी रुपयांचे दान साई दरबारात झाले आहे.दरवर्षी शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणावर भक्त दर्शनासाठी येतात या मध्ये स्टार, सिलेब्रिटी,राजकीय नेते,क्रिकेटर्स ,मोठे उद्योगपती यांचा देखील समावेश असतो.

शिर्डी मधील दानपेटीत २९ देशातील २४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या परकीय चालना सह ३९ लाख ५३ हजार रुपयांची सुमारे ८६०.४५० ग्रॅम सोने आणि ५ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १३३४५ ग्रॅम चांदी इतक दान मिळालाय . साई दर्शन साठी आलेल्या भाविकांना साई संस्थान प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध करून दिल्या.

शिर्डी मधील प्रसाद हा नेहमीच खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.व सुट्ट्यांच्या काळात अधिक गर्दी असल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणावर प्रसादाच वाटप करण्यात आल होत.त्याच सोबत अत्याधुनिक साई भक्त निवास ,साई सुपर स्पेशालीटी रुग्णालय,व साई नाथ रुग्णालय शैक्षणिक संस्था आदींसह ईतर पायाभित सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. शिर्डी मधील भक्त वर्गासाठी व गरजू व्यक्तींसाठी साई मल्टीस्पेशालीटी मोफत किंवा कमी दारात चांगल्या प्रकारचे उपचार सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

शिर्डी मध्ये मिळालेल्या दानाचा तपशील पुढील प्रकारे

*दक्षिणा पेटी -३ कोटी ११ लाख ७९ हजार १८४ रुपये

*देणगी काउंटर-७ कोटी ५४ लाख ४५ हजार ४०८ रुपये

*ऑनलाईन देणगी -१ कोटी ४५ लाख ४२ हजार ८०८ रुपये

*चेक -३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये

*मनीऑर्डेर-७लाख २८ हजार ८३३ रुपये

*डेबिट /क्रेडीट कार्ड -१ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये

*सोने -८६०.४५० ग्रॅम

*चांदी -१३३४५.९७० ग्रॅम

*परकीय चलन-२४.८० लाख (२९ देशांचे )