‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानात मोदींकडून श्रमदान

मुंबई:- राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५४ व्या जयंतीनिमित्त देशभरात ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम राबवली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींही या मोहिमेत भाग घेतला कुस्ती पटू अंकित बय्यनपुरीया पंतप्रधानांसोबत होते. यावेळी स्वच्छ आणि निरोगी भारत असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी(prime minister narendar modi) दिला. मागील महिन्यातील ‘मन की बात'(man ki bat) कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी १ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून स्वच्छतेसाठी श्रमदानाचे आवाहन केले होते.

पंतप्रधानांनी त्यासाठी ‘एक तारीख एक तास एक साथ'(one date one hourse)अशी घोषणाही केली होती. रविवारच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ (‘Cleanliness is service’)या मोहिमेसाठी देशभरातील ६.४ लाख ठिकाणांची निवड करण्यात आली होती. भाजप अध्यक्षा जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी विविध राज्यात सफाई अभियानात सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश दिला.

गृहमंत्री अमित शहा(central home minister amit shaha) यांनी अहमदाबाद मध्ये श्रमदान केले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही(bhupendra patel) ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेत सहभागी झाले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(om birla) यांनी राजस्थानमधील कोटा शहरात स्वच्छता केली तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापुर मध्ये स्वच्छता मोहीम मिळत भाग घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत मुंबईत आपला सहभाग नोंदवला. पाटण्यात भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी हातात झाडू घेऊन रस्ते सफाई केली.