Home » पती झाला नकोसा! पत्नीने सुपारी देत विषयच संपवला..

पती झाला नकोसा! पत्नीने सुपारी देत विषयच संपवला..

by नाशिक तक
0 comment

अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या शेजारीच राहणाऱ्या दाम्पत्यास १ लाखांची सुपारी देऊन आपल्या पतीला संपवायला सांगितले. ही धक्कादायक घटना मुंबईच्या गोरेगांव येथील भगतसिंगनगर चाळीतली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कमरुद्दीन मोहम्मद अन्सारी असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमरुद्दीन मोहम्मद अन्सारी हा आपली पत्नी आयशा खान हिच्या सोबत गोरेगांव येथील भगतसिंग नगर येथे चाळीत राहतो. त्याची पत्नी आयशाचे हरिश खान सोबत प्रेमसंबध होते. त्यामुळे तिला तिचा पती नकोसा झाला होता. म्हणून आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि त्याची पत्नी सौफिया बिलाल पठाण या दाम्पत्यांना एक लाखाची सुपारी दिली.

या दोघा पती पत्नीनी मयत कमरुद्दीनला नायगांवच्या खाडी किनारी नेवून, डोक्यावर प्रहार केला आणि त्यानंतर त्याचा तीक्ष्ण हत्यारान गळा चिरुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह खाडीत टाकून दिला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांतून अनैतिक संबंधांतून खुनाच्या घटना घडल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यात असले प्रकार मुंबईत जास्त घडत आहेत. पती-पत्नीच्या वादातून कोनचा एकाचा बळी जात असून हे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. पोलिसांचा वचक नसल्याचे यातून स्पष्ट होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!