शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड करत वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता काल शिवसेनेचे 18 पैकी बारा शिंदे गटात सामील झाले आहेत. आणि लोकसभेवरील खासदारांचा गटनेता देखील बदलण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या जागी खासदार राहुल शेवाळे यांना नवीन गटनेते बनवण्यात आले आहे.या बारा खासदारांच्या बंडा नंतर आता राज्यभरातील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अतिशय तिखट भाषेत खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली आहे.
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही टीका केली आहे. बडगुजर म्हणाले आहेत की नाशिक शहरातला एक खासदार शिंदे गटात गेला आहे. त्याचं फार आम्ही वाईट वाटून घेत नाही. त्याच आम्ही दुःखही करून घेत नाही “तो गद्दार गद्दारच” होता असे म्हणत शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांचा शिंदे गटात गेल्याने निषेध केला आहे .तसेच पुढे सुधाकर बडगुजर म्हणाले आहेत नेते स्वार्थी असतात म्हणून ते गेले आहेत आमच्याकडे कार्यकर्ते हे निस्वार्थी आहेत आणि शिवसेनेकडे निस्वार्थी लोकांची फळी फार मोठी आहे. असे देखील म्हणाले आहेत .
नाशिक लोकसभा मतदारसंघात तसेच मालेगाव आणि नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पर्याय असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे चाळीस आमदारांनी बंड केल्यानतर नाशिक मध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद निर्माण झाला होता त्यानंतर आता खासदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिंदे गट खासदार असा वाद पाहायला मिळू शकतो.