ईडी कडे संजय राऊतांविरोधात भक्कम पुरावे म्हणून कोठडीत वाढ?

शिवसेना नेते संजय राऊत यांना 31 तारखेला ईडीने सलग नऊ तास चौकशी करून ताब्यात घेतले त्यांनतर त्यांना उशिराने अटक करण्यात आली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले केल्यावर कोर्टाकडून त्यांना चार ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपल्यानंतर राऊत यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा कोर्टाने 8 ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीकडे संजय राऊत यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचा ईडीने कोर्टात दावा केला आहे . आणि संजय राऊतयांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे.

ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद

संजय राऊतांविरोधात महत्त्वाची महत्त्वाची कागदपत्र मिळाल्याचा ईडीने कोर्त्या दावा केला आहे . असेच प्रवीण राऊतां कडून 3 कोटी रुपये राऊतांना मिळाले आहेत आणि त्याच पैशातून राऊत यांनी आपल्या बायकोच्या नावावर अलिबाग मध्ये जमीन घेतल्याचं ईडी ने कोर्टात सांगितले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चाचा तपशील तपासत असल्याचे देखील कोर्टात सांगितलं आहे , संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची खाती देखील तपासत असल्यास म्हटल आहे. एक कोटी सहा लाख आणि एक कोटी आठ लाख वर्षा राऊत यांनी अनोळखी व्यक्तीला पाठवले आहेत असा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत वर्षा राऊत यांच्या खात्यावरील मोठ्या व्यवहारांची पडताळणी करायची असल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितलं आहे .

ईडी आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे आता आठ ऑगस्टपर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली आहे.


संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स
 संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? या बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे. तर संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची एकत्रित चौकशी होऊ शकते