Home » एकनाथ खडसे गुलाबराव पाटलांवर बरसले, म्हणाले, मी पानटपरी…

एकनाथ खडसे गुलाबराव पाटलांवर बरसले, म्हणाले, मी पानटपरी…

by नाशिक तक
0 comment

मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. सभेत मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यात गुलाबराव पाटलांनी नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांच्यावर चुना लावण्याची सडकून टीका केली होती. आता एकनाथ खडसे यांनी त्यांना प्रतिउत्तर देत त्यांचावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.


चुना लावायला मी कोणत्या टपरीटुपरीवर काम करणारा नव्हतो

एकनाथ खडसे म्हणाले, ‘हो मी अनेकांना चुना लावला, मी भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलपर्यंत मी पाठवलं.” त्यांचा मागे लागलो, त्यांचाविरोधात सतत आवाज उठवला”

”यात जे प्रामाणिक होते, त्यांना माझी भीती वाटली नाही, जे नव्हते त्यांना माझी भीती वाटली. मी कुणाला बुडवलं, फसवलं नाही. मी माझ्या बापजाद्यापासून श्रीमंत आहे.”

”माझ्या आईवडिलांपासून माझी आर्थिक स्थिती चांगली आहे. मी कोणत्या टपरीटुपरीवर काम करणारा नव्हतो, त्यामुळे मला कुणाला चुना लावण्याची गरज भासली नाही, जे आहे ते माझ्याकडे वडलोपार्जित आहे.”

एकनाथ खडसेंनी त्यांचावर चांगलाच हल्लाबोल केला असून ते म्हणाले, तुम्ही म्हणताय नाथाभाऊ शून्य झाला आहे. नाथाभाऊ राजकारणातून बाहेर पडला असेल तर माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री आणि एवढे मंत्री घेऊन येऊन गरळ ओकायला येता कशाला असा सवाल देखील खडसेंनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!