नाशिक : महानगरपालिकेच्या अंतिम मतदार याद्या पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. नाशिकसह तीन महापालिका पुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख मतदार याद्या घोषित झाल्यानंतर महापालिकेत बराचसा गोंधळ पाहायला मिळाला आणि तो गोंधळ सावरताना प्रशासनाची दमछाक होत आहे .नाशिक पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात अधिक प्रमाणात हरकतींचा पाऊस पडल्याने त्याची छाननी करून त्या अपलोड करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी 21 जुलै रोजी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी याद्या १६ जुलैला प्रसिद्ध होणार होत्या .
महापालिका मतदार यादी २३ जून रोजी घोषित झाल्या नंतर प्रभागनीहाय म्हणजे ४४ प्रभागांची यादी तयार करताना त्यात प्रचंड घोळ झाल्याचे आढळून आल्याने त्यावर हरकती घेण्यात आल्या त्यामुळे मतदार याद्यांवर विकारमी 3847 इतक्या हरकती आणि सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या . राजकीय हस्तक्षेप आणि दुर्लक्षामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारीमुळे महापालिका आयुक्त रमेश पवार यांना अनेक राजकीय पक्षांनी भेटून निवेदन दिले यामुळे छाननीच्या कामास विलंब झाल्याने छाननीच्या कामासाठी मुदत वाढ देण्याची मागणी महापालिकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ९ जुलैपर्यंत हरकतींची चौकशी करणे शक्य नसल्याने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 16 जुलैपर्यंत मुदत वाढ दिली होती. आता कंट्रोल चार्ट वेळत बनवणे शक्य नसल्याने आयोगाने महापालिकांना अंतिम मतदार याद्या दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.