मुंबई। प्रातिनिधी
कायम वादग्रस्त असणाऱ्या राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोप आदिवासी संघटनांनी (Tribal Organization) केला होता. यावर आदिवासी संघटना आक्रमक झाल्यानंतर अखेर राखी सावंत यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.
राखी सावंत या आपल्या डॅशिंग आणि बिनधास स्वभावामूळे नेहमी चर्चेत असतात. यात काही दिवसांपूर्वी राखी सावंतचे एक गाणे रिलीज झाले. या गाण्याच्या रिलीज दरम्यान राखी सावंतने आदिवासी पेहराव परिधान केला होता. त्यावेळी तिने एका रिलच्या माध्यमातून “मी आदिवासी लुक केल्याचे” (Tribal Look) विधान केले होते. त्यामुळे देशातील आदिवासींच्या भावना दुखावल्याने राखी सावंत विरोधात आदिवासी संघटना व समाज आक्रमक झालेला होता.
दरम्यान, (दि २७) रोजी राखी सावंत यांच्या बंगल्यावर आंदोलनहि करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव (lucky Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांना (Mumbai Police) निवेदन देण्यात आले.
यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दाखल घेत राखी सावंत यांना नोटीस बजावण्यात आली. मुंबई पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर राखी सावंतने एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे.