नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. दोन्ही उमेदवारांना आपणच येऊ असा ठाम विश्वास असून चुरस वाढली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले असून भाजपला डिवचण्याचे काम केले आहे. नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत असे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यातून त्यांनी भाजपला डिवचले आहे.
भाजपला नाशिक पदवीधरसाठी उमेदवार मिळाला नाही, सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. आमच्या माविआच्या शुभांगी पाटील ह्या उमेदवार असून नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत असे विधान जयंत पाटील यांनी केले आहे.
सत्यजित तांबे आघाडीवर
बहुचर्चित नाशिक पदवीधर निवडणुक मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून या फेरीत सत्यजित तांबे आघडीवर तर मविआच्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत. सध्या तांबे आणि पाटील यांच्यामध्ये मोठी चुरस असून कांटे की टक्कर होत आहे. यात एका टेबलवर 1 हजार पैकी 600 हून अधिक मते सत्यजित तांबे यांना पडली आहेत. त्यामुळे तांबे यांनी आघाडी घेतली असून शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.