धक्कादायक! नाशिकमध्ये ईव्हीएम मशीनच असुरक्षित; दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांनाच ईव्हीएम मशीनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबड येथील एका गोदामात ठेवण्यात आलेले ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन असुरक्षित असल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड येथील केंद्रीय वखार मंडळ मध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र या मशीनच्या निगराणीसाठी करण्यात येणारे सिसीटीव्हीं रेकॉर्डिंग जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी मागूनही सादर केले नाही, म्हणून नायब तहसीलदार राजेश आहीरे यांनी मीना सारंगधर, अक्षय सारंगधर अशा दोंघाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी निवडणूक नायब तहसीलदार राजेश दिवाकर आहिरे यांनी तक्रार दिल्यानंतर हि बाब उघडकीस आली आहे. आहिरे दिलेल्या तक्रारीत २७ फेब्रुवारी २०१९ ते ११ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांना अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे ठेवलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या सुरक्षेसाठी भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिसीटीव्ही रेकॉर्डिंग निर्देशांनुसार ठेवले नाही. ते वेळोवेळी मागितले असता ते दिले नाही आणि शासनाची फसवणूक केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरण सरकारवाडा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.