अमली पदार्थांविरोधात नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; लाखोचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी नाशिक पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत अवैध रित्या अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणार्‍या इसमां विरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने कारवाई करत नाशिक पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्या हद्दीत वावरे लेन, शालिमार, शिवाजी रोड नाशिक येथे दोन इसम हे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे वरिष्ठांच्या आदेशाने अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व विशेष पथकाने वावरे लेन येथील म्हसोबा मंदिरा शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये शिवाजी रोड शालिमार येथे छापा मारून संशयीत पवन सुकदेव वाडेकर आणि द्यानेश्वर बाळू शेलार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेला ६०४ किलो ३०० ग्राम वजनाचा ३ लाख ३० हजार १५३ रुपये किमतीचा भांग जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पुढील कार्यवाही साठी भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

ही कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा वसंत मोरे, वसिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुद्दगल यांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक डि.के. बांगर, एच.नागरे, पि.बी.सूर्यवंशी, पोलीस हवालदार भामरे, गायकर, बेंडाळे ,ताजने,दुमणे, भालेराव, डंबाळे ,कोल्हे, बाळासाहेब नांद्रे, दिघे, सानप, येवले, कुटे, वडजे, बागडे, फुलपगारे, भड आदींनी कामगिरी केली आहे.