नाशिक : कुजलेल्या अवस्थेत झाडाला टांगलेला मृतदेह नाशिक-त्र्यंबकेश्वर (The body was found hanging from a tree in a decomposed state on the Nashik-Trimbakeshwar road) रोडवर सापडला आहे. विद्यामंदिर वनपरिक्षेत्रात (Vidya Mandir Forest area) हा बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांकडून हा मृतदेह ३ ते ४ महिने जुना असल्याचा संशय (The body is suspected to be 3 to 4 months old) व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. दरम्यान आता हे प्रकरण नेमकं काय याचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील वासाळी शिवारातील ही घटना घडली आहे. कुजलेल्या अवस्थेत बेवारसपणे झाडाला टांगलेल्या या मृतदेहाची घटना समोर येताच परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी आहे की, सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या त्रंबकेश्वर रोडवरील त्र्यंबक विद्यामंदिर वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत झाडाला टांगलेला मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची अवस्था पाहता तों तीन ते चार महिन्यापूर्वीचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी त्या शिवारात गुराखी गुरे चारत असतांना ही घटना समोर आली आहे. गुराखी गुरे चारत असतांना त्याच्या निदर्शनास हा मृतदेह आला. तेव्हा प्रथम ही घटना समजली. या गुराख्याने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मात्र हा मृतदेह कोणाचा? या घटनेमागे नेमके कारण काय असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान पोलिस तपासात काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागून असेल.