नाशिक : आज गांधी नगर कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनचा (Combat Army Aviation, Nashik) दीक्षांत समारंभ सोहळा (Convocation ceremony) पार पडला. कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनमध्ये हवाई प्रशिक्षण दिले जाते (Air training is provided in Combat Army Aviation). दरम्यान आता कॅटची ३८ वी तुकडी देशसेवेत दाखल होणार आहे (The 38th batch of CAT will be inducted into national service). त्यामुळे या तुकडीचा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. दीक्षांत समारंभात आर्मीकडून हवाई चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हे प्रात्यक्षिके बघतांना युद्धभूमीवर घडणाऱ्या घटनांची प्रेक्षकांना आठवण झाली. त्यानंतर उत्कृष्ट कॅण्डीडेट, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट वैमानिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव (best pilot were honored with the award) करण्यात आला.
शिस्तबद्ध पडणारी पाऊलं, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण असे वातावरण या समारंभाप्रसंगी गांधीनगर येथे तयार झाले होते. कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये ३८ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात युद्धाभूमीचे एक चित्रच तयार झाले होते.
गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये ३८ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये (Nashikroad Combat Army Aviation School) हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते. हेच प्रशिक्षण घेऊन युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची ३८ वी तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे.
दीक्षांत सोहळ्यावेळी संचलन झाले. चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. प्रांगणात हवाई दलाच्या (air force) हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर केल्या. ज्यामुळे उपस्थित खिळून राहिले. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३८ वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पहा व्हिडिओ :