By चैतन्य गायकवाड |
छोट्या पडयावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख असलेला अभिनेता करणवीर बोहरा (actor Karanveer Bohra) आता एका प्रकरणात अडकला आहे. या अभिनेत्याबाबत एक गोष्ट उघडकीस आली आहे. एका 40 वर्षीय महिलेने करण आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara police station) करणवीरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने याबबत वृत्त दिले आहे. एका 40 वर्षीय महिलेने करणवीरवर आरोप केला आहे की, 2.5 % व्याजावर पैसे परत करण्याचे आश्वासन करणवीरने दिले होते. पण त्याने केवळ १ कोटी रुपये परत केले आहे.
महिलेने या तक्रारीत आपली ९९ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच, तिच्याकडून सहा जणांनी १ कोटी ९९ लाखांची रक्कम घेतली होती. ही रक्कम २. ५ टक्के व्याजासह परत करण्याचा करार त्यांच्यात झाला होता. मात्र या महिलेला आतापर्यंत फक्त १ कोटी रुपयेच परत करण्यात आले आहे. त्यामुळे बाकीचे पैसे आणि व्याज परत मिळवण्यासाठी या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेने पुढे म्हटले आहे की, जेव्हा ती करणवीरकडे आपल्या पैशांची मागणी करायला गेली, त्यावेळी करणवीर आणि त्याच्या पत्नीने तिला योग्य प्रतिसाद दिला नाही. तसेच तिला गोळ्या घालण्याची देखील धमकी दिली. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, करणवीरयाने कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या ‘लॉकअप’ (lockup) या रिॲलिटी शोमध्ये (reality show) आपल्यावरच्या कर्जाचा खुलासा केला होता. करणवीर याने अनेक कार्यक्रमात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘एक से बढ़कर एक’, ‘कुबूल है’, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘नागिन 2’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे.