शेतकऱ्यांना योग्य वेळेत का मिळालीत खते


सुरगाणा : लुक्यात उंबरठाण परिसरात खताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना वाजवीपेक्षा चढ्या दराने खत खरेदी करावे लागत होते. या मुळे या भागातील शेतकरी प्रचंड चिंतेत होते. पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित,माजी सरपंच चंद्रकांत वाघेरे, उंबरठाण साईकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक वनराज देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना नाशिक येथील एम.ए.आय.डी. सी. यांचे मार्फत शेतकऱ्यांना आता थेट बांधावर खत उपलब्ध झाले आहे.यावेळी शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले

खत वेळेत मिळाल्याने शेतक-यांना.आता याचा चांगलाच फयदा होणार आहे . ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांचे पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना खतामुळे मोठ्या प्रमाणात मान्स्थापा सहन करावा लागत होता . आता खत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानी व्यक्त करण्यात येत आहे . यावेळी कृषी मंडळ अधिकारी हिरे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, कृषी सहाय्यक गुलाब भोये, शेतकरी लक्ष्मण खोटरे, माधव पवार,चंदर गावित, कृष्णा कणसे, माळी बाबा जाधव, सुरेश वाघमारे, महा तुळशीराम वार्डे, सोनिराम म्हसे, पांडुरंग वाघमारे, हरी मोरे, काशिनाथ पवार, दिगंबर चौधरी, रामू कणसे भास्कर देशमुख आदी उपस्थित होते.