नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात (Fatal accident on Sinner-Shirdi highway) झाला. शिर्डीवरून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबईच्या साई भक्तांवर नियतीने घात केला आहे. हा अपघात एवढा थरारक होता की त्यात गाडीचा चेंदा-मेंदा झाला आहे. देवपूर फाट्याजवळ साई भक्तांचा हा भीषण अपघात झाला असून या अपघातात २ जण ठार झाल्याची माहिती मिळतेय. अपघाताची ही दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.
सिन्नर जवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई येथील काही साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला आले होते. यावेळी ते दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना तवेरा कंपनीच्या क्रमांक एम एच ०४ क्यू झेड ९२२८ या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा वेग जोरात असल्याने गाडीने महामार्गावरून दीडशे फूट लांब वर पलटी घेतली. यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातात मीरा-भाईंदर येथील इंद्रदेव मोरया (२८) आणि सत्येंद्र यादव (२७) यांना गंभीर मार लागल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर या वाहनातील आणखी सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या आणि काही स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना नाशिकच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सिन्नर-शिर्डी महामार्ग साई बाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांमुळे कायमच गजबजलेला असतो. कोरोनामुळे दोन वर्ष या रस्त्यावरची गजबज कमी होती. मात्र कोरोना काळानंतर कुलूपबंद असणारे शिर्डी मंदिर उघडल्यानंतर हा रास्ता पाहिल्याप्रमाणेच पुन्हा गजबजला आणि शिर्डी साईबाबांच्या दर्शनाची आतुरता भक्तांना लागली. त्याचप्रमाणे साइदर्शनास आतुर असलेले हे मुंबईचे भक्त शिर्डीवरून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेले होते. त्यांची शिर्डीला जाऊन साई बाबांचे दर्शन घेण्याची इच्छा तर पूर्ण झाली मात्र परतताना नियतीच्या इच्छा काही औरच होती. वेगवान गाडीवरून वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने महामार्गावरून दीडशे फूट लांब वर पलटी घेतली. परिणामी ७ जण गंभीर जखमी तर २ जण ठार झाले. या आधीही या महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात झाले आहे. मात्र आज सकाळी झालेल्या या अपघाताने थरकाप उडवला आहे.