नाशिक : मुलाचा गळा दाबून खून केल्यांनतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील पंचवटी परिसरातील ही घटना आहे.
जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असे मृत व्यक्तींचे नाव आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, वडील जगदीश जाधव यांनी मुलगा प्रणव जाधव याची गळा दाबून हत्या केली असावी. त्यांनतर वडिलांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे
पंचवटी परिसरात राहत्या घरात ही घटना घडली आहे. वडिलांनी मुलाची हत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हत्या व आत्महत्या का झाली याप्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करत आहे.