नाशिक: नाशिक शहर पोलीस दलात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून सलग दोन दिवसात दोन पोलिस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
काल आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले आहे. तक्रार अर्जाच्या चौकशीत तक्रारदाराचा धनादेश न वटल्याचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याविरुद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार नोंदवू नये यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या हवालदार राजेश हरी थेटे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकाराची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.
या प्रकरणाला एक दिवस उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या महिला अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही लाच घेताना जाळ्यात अडकले आहे. पोलिस चौकीतच पैसे घेताना या दोघांना अटक करण्यात आले आहे. सलग दोन दिवसांत दोन कारवाया झाल्याने शहर पोलिस दलात एकाच खळबळ उडाली आहे.