फिल्मी सितारे ऋषभ पंतच्या भेटीला

अपघातग्रस्त झालेल्या क्रिकेटपटू ऋषभ पंतला क्रिकेट क्षेत्रासह चित्रपट सृष्टीतील देखील तारे धीर देत आहे. काल सकाळी ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान त्याच्यावर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी आज पंतची रुग्णालयात भेट घेतली आहे.

अपघात ग्रस्त ऋषभ ची भेट घेत अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी त्याची इचार्पूस केली आहे. त्यासोबतच ‘ऋषभसाठी लोकांनी प्रार्थना करावी.’ असं आवाहन देखील केले आहे. ऋषभ च्या अपघाताने क्रिकेट विश्वासह चित्रपट विश्वालाही धक्का बसला आहे. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हिराबेन मोदी यांच्या निधनामुळे मातृवियोग झालाय त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, दु:खामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ऋषभ पंत याला धीर दिला होता. अशा प्रकारे सर्वच स्तरातून ऋषभ ला धीर दिला जात आहे. त्याच्या साठी लवकर बरे होण्याची सर्वच प्रार्थना करताना दिसत आहे.

ऋषभ पंत च्या भीषण अपघाताचे वृत्त समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली होती. क्रिकेट विश्व असो की क्रिकेट चाहते सर्वच त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि तो लवकर स्वस्थ व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. भारतीय आणि परदेशी क्रिकेटर देखील त्याने लवकरात लवकर बरे व्हावे या साठी प्रार्थना करत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. त्याच्यावर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऋषभ आता मैदानावर केव्हा परतेल ?

तीन दिवसांपूर्वी श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या वनडे t20 मालिकेत ऋषभ पंत बाहेर झालेला होता. त्यानंतर त्याला अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमा झाल्यात त्यात कपाळ, उजव्या हाताचे मनगट, उजव्या पायाचा गुडघा, घोटा आणि अंगठा आदींचा समावेश आहे आणि नेमका याच भागाचा यष्टीरक्षणाच्या वेळी मोठा उपयोग होतो. त्यामुळे रिषभ ला मैदानावर परतण्यास किती वेळ लागू शकतो याविषयी अनेक मत मांडली जात आहेत. अशात किमान वर्षभरानंतरच ऋषभला पुन्हा पीचवर परतता येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.