शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून साडेपाच लाखांना गंडा

पुणे: दुप्पट परताव्याचे अमिष दाखवत पुण्यातील एका व्यावसायिकास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्यानुसार व्यावसायिकाने साडेपाच लाख रुपयांची गुंतवणूक केली असता त्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी संशयित इमरान खान इनामदार ( रा.बास्तेवाड ता. शिरोळ कोल्हापूर ) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलीस ठाण्यात निलेश अशोक भालेराव (महंमदवाडी पुणे ) यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. 15 जानेवारी 2022 ते आज पर्यंत हा प्रकार घडलेल्या आहे. इनामदार यांनी त्याची स्वतःची टाईम ऍग्रो नावाची कंपनी शेअर मध्ये गुंतवणुकीवर अनुक्रमिती हजार रुपयांचा एक लाख वीस हजार रुपये आणि वीस हजार रुपये परवा मिळेल असे सांगून सुरुवातीला एकूण पन्नास हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे.

फिर्यादी भालेराव यांचे कोणते शहर ट्रेडिंग साठी डिमॅट अकाउंट नसताना एजंट म्हणून आरोपीने काम केले टाईम ऍग्रो शेअरचा स्लॉट खरेदी केले ते भासवून सदर शेअर्सची किंमत वाढवून त्याची एकूण पाच लाख 48 हजार रुपये झाली असता तसे कोणतेही शेअर्स खरेदी न करता व त्याप्रमाणे कोणताही परतावा न देता बँकेत परताव्याचे पैसे भरण्याची खोटी पावती तक्रारदार यांना संशयित आरोपीने पाठवली अशाप्रकारे तक्रारदार यांची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चक्रधराने पैसे परत मागितल्यावर फोनवरून आरोपींनी शिवीगाळ केली आहे याबाबत वानवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.