By Pranita Borse
नाशिकमध्ये आज सकाळपासूनच पावसाने दमा’धार’ हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शहरातील प्रमुख नदी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीची (Godavari river) पाणी पातळी वाढली आहे. नदीला जोडणाऱ्या नाल्यांच पाणी, शहरातील रस्त्यांवरील पाणी नदीपात्रात आल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीला पूर आल्याचे दिसून येत आहे. जून महिना ओलांडला तरी नाशिककडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे धरणक्षेत्रात घट झाल्याचे पाहायला मिळालं होते. नाशिककरांसमोर पाणी कपातीचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली होती. मात्र, आज पावसाने सकाळपासूनच नाशकात जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
शहरात सकाळपासून बरसत असलेल्या पावसाच्या सरींमुळे शहरात सगळीकडे पाण्याचे साम्राज्य निर्माण झालं आहे. संततधार पावसामुळे भरलेल्या नाल्यांचे, रस्त्यांवरील पाणी नदीपात्रात आल्याने गोदावरीला पूर आल्याचे दिसून येत आहे. ज्या गोदावरी नदीला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग केल्यानंतरच पुर आल्याचं पहायला मिळतं, त्या नदीला धरणातून विसर्ग नसतानाही सकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पूर आल्याचं चित्र आहे. गोदावरीच्या या पुरामुळे पंचवटीमधील गंगाघाट, रामकुंड परिसरातील काही छोटी-मोठी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेली आहे. त्यासोबतच नदीकाठी उभी केलेली अनेक वाहन देखील या पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्हा आणि मनपा प्रशासनाकडून खबरदारी
गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड (Ramkund) परिसरातील काही छोटी-मोठी मंदिर, पंचवटीमधील गंगाघाट (Gangaghat) पाण्याखाली गेल्याच पाहायला मिळत आहे. त्यासोबतच नदीकाठी उभी केलेली अनेक वाहन देखील या पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे एवढ्या दिवस पावसाची प्रतीक्षा नाशिककरांना होती. त्या पावसाने दमा’धार’ सरी बरसवत नाशिककरांना ओलचिंब करून सुखावलं आहे. सतत बरसणाऱ्या धारांमुळे गोदावर नदीची पाणीपातळी वाढली आहे. अशात आणखी काही दिवस हवामान खात्याने नाशिकला संततधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. यामुळे नाशिक जिल्हा व मनपा प्रशासन देखील नदीकाठच्या लहान-मोठे विक्रेते, दुकानदार, टपरिधारक आणि नदी काठच्या नागरिकांना नदी काठापासून दूर राहण्यासाठी आव्हान केले जात आहे.