Home » पैश्यांसाठी मुलांनी आपल्याच आईचा घोटला गळा! नाशिकची घटना..

पैश्यांसाठी मुलांनी आपल्याच आईचा घोटला गळा! नाशिकची घटना..

by नाशिक तक
0 comment

नाशिकच्या मालेगावातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पैश्यांसाठी दोघा मुलांनी आपल्या जन्मादात्रीचाच गळा आवळून खून केला आहे. त्यात आपला गुन्हा लपवण्यासाठी आईने आत्महत्या केल्याचा बनवही या मुलांची रचला होता. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. ३०) मालेगावच्या दाभाडी येथील गिसाका कॉलनीत सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नराधम मुलांबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुलकनबाई किसन सोनवणे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा मुलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगावच्या गिसाका कॉलनीत सुलकनबाई या मोठा मुलगा भगवान किसन सोनवणे व लहान मुलगा संदीप किसन सोनवणे यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. सुलकलबाई यांच्या पतीचे निधन झाले होते त्यातून सुलकलबाई यांना पैश्यांची मोठी रक्कम मिळाली होती. या पैश्यांवरून त्यांचे मुले त्यांच्याशी सतत वाद होत होते. सोमवारी देखील सकाळच्या सुमारास असाच वाद झाला. मात्र हा वाद विकोपाला गेला, आणि भगवान आणि संदीप यांनी मागेपुढे न पाहता आपल्याच आईवर हल्ला चढवला. सुलकनबाई यांचा दोरीने गळा आवळून खून केला.

दरम्यान, सुरुवातीला आपल्या आईने आत्महत्या केली असा बनाव या आरोपी मुलांनी केला. तशीच बतावणी त्यांनी सर्वाना केली. मात्र पोलिसांच्या संशयाच्या फेऱ्यात हे अडकले. आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांनी गळा घोटून मारल्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या मृत्यूनंतर सुलकनबाई यांनी मुलांचा सांभाळ केला. आणि मुलांनी त्यांचा असा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!