राज्यात प्रथमच बाजार समितीची जाहीर होणार क्रमवारी

राज्यातील बाजार समितीची प्रथमत क्रमवारी जाहीर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत राज्यभरातील बाजार समिती यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनायाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभर प्रथमच अशा प्रकारे बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर होणार आहे अशी माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली आहे जागतिक बँकेच्या सहकाऱ्यांना राज्यांमध्ये स्मार्ट प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पांतर्गत पणन संचालनालय स्तरावर प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कार्यरत आहे.


राज्यभरातील बाजार समिती यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे त्यानुसार राज्याच्या कृषी बाजार व्यवस्थेतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचे निकोप स्पर्धा निर्माण होईल .त्यासाठी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा नुसार निकष तयार करण्यात आलेले आहेत क्रमवारी ठरवण्यासाठी 35 निकष व 200 गुण ठरविण्यात आले आहेत.