देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या ८ हजारांच्या पार…

By चैतन्य गायकवाड |

नवी दिल्ली : देशात नवीन कोरोना रुग्णांच्या (new corona patients in country) संख्येत सलग तिसऱ्या दिवशी तब्बल ८ हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८०८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी (दि. ११ जून) देशभरात ८५८२ नवीन कोरोना बाधित आढळले होते. त्या तुलनेत काल दिवसभरात नवीन नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. रविवारी (दि. १२ जून) देशभरात ८०८४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ४५९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९९५ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter account) ही माहिती दिली आहे.

Corona statistics

सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा ८ हजार पार… देशभरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे. देशात गुरुवारी (दि. ९ जून) ७५८४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर शुक्रवार पासून देशात सलग तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा ८ हजारांच्या वर गेला आहे. शुक्रवारी (दि. १० जून) ८३२९ नवे कोरोना बाधित आढळले होते. शनिवारी (दि. ११ जून) कोरोना बाधितांचा आकडा ८५८२ इतका झाला होता. त्यानंतर काल (दि. १२ जून) ८०८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नवीन ८०८४ रुग्णांमुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची (total corona cases) संख्या ४ कोटी ३२ लाख ३० हजार १०१ एवढी झाली आहे. देशात सध्या कोरोना रिकव्हरी दर (recovery rate) ९८.६८ टक्के इतका आहे. तर सक्रीय रुग्णांचा दर (active cases rate) ०.११ टक्के इतका आहे. देशात दररोजचा सकारात्मकता दर (positivity rate) ३.२४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात २,४९,४१८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. देशात आजपर्यंत एकूण ८५ कोटी ५१ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, मुंबईची (Mumbai) नवीन कोरोना रुग्णांची आकडेवारी बघितल्यास रविवारी येथे १ हजार ८०३ नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तर २४ तासांत ९५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ८८९ इतकी झाली आहे.