हृदयद्रावक..! विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू; पहा बातमी

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . वीजेच्या तारा ओढत असताना चार कामगारांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे . ही दुर्दैवी घटनेणे एकच एकाच खळबळ उडाली आहे . ही घटना कन्नड तालुक्यातील हिवरखेडा येथे घडली आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील नावडी या गावातील चारजण हिवरखेडा नांदगीर वाडी येथे विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांना विद्युत तारांचा शॉक लागला आणि त्या चारही जणांचा जागीचं मृत्यु झाला आहे . ही घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घटली आहे. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर असे या घटनेत मृतू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही कन्नड तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नावडीसह संपूर्ण कन्नड तालुक्यातच शोककळा पसरली आहे.