गौतमी पाटील आज थिरकणार नाशिकमध्ये; रस्त्यांवर झळकले बॅनर्स

नाशिक : सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून प्रसिद्ध झालेली आणि राज्यभरात तरुणांमध्ये क्रेझ असलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) हिच्या नृत्याचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. निफाड तालुक्यात (Nashik, Niphad) हा कर्यक्रम होणार असून, त्यासाठीचे बॅनर्स निफाड शहरातील रस्त्यांवर लागले आहेत.

आज निफाड मध्ये नृत्यांगना गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) हिच्या नृत्याचा कार्यक्रम होत असून त्यासाठीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यात गौतमी पाटीलचा जलवा कसा आहे, हे समाज माध्यमांवर सर्वांनी पहिलाच आहे. राज्यभरात गौतमी पाटील ची सध्या तरुणांमध्ये क्रेझ वाढली असून तिच्या नृत्यांचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे. अशाच पद्धतीने नाशिकच्या निफाड मध्ये देखील लावणीचा कार्यक्रम होणार आहे.

सध्या गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे वादाच्या भवऱ्यात सापडलेली आहे. मात्र तरी देखील तिच्या नृत्याची क्रेझ ही अनेक तरुणांना भुरळ घालणारी आहे. अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचा आरोप गौतमी पाटील वर केला जात आहे. तिच्यावर टीकेची झोड देखील उठत आहे. तर कुणी हे तिचे काम असून तिच्या कलेचे कौतुक करत आहे. हा वाद असला तरी देखील तिची लोकप्रियता हे राज्यात कमी होताना दिसत नाहीये. ती उलटच वाढताना दिसत आहे.

कार्यक्रमाचे तिकीट असणार…पहा कसे असणार दर..

निफाडमध्ये रायगड ग्रुपच्या माध्यमातून लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गौतमी पाटीलची लावणी ठेवल्यावर तुफान गर्दी होईल. या आधीही ही गर्दी आपण समाज माध्यमांवर पहिली असेल त्यामुळे महोत्सवासाठी तिकीट ठेवण्यात आले आहेत. यात २०० रुपये, ५०० रुपये, १ हजार रुपये आणि ३ हजार रुपये असा तिकीट दर ठेवण्यात आला आहे. आज सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील येणार असल्याने मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता देखील आहे.

VVIP आणि VIP तिकीट मर्यादित उपलब्ध

‘सबसे कातील गौतमी पाटील’ नाशिक जिल्हा व आपल्या निफाड शहरात प्रथमच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा भव्य लावणी महोत्सव असा आशयाचे बॅनर निफाड शहरातील रस्त्यांवर लागलेले आहेत. VVIP आणि VIP तिकीट (. Limited VVIP and VIP tickets available) मर्यादित उपलब्ध आहेत, असे देखील त्यावर टिप म्हणून टाकण्यात आलेले आहे.