भंगारच्या वादातून घंटागाडी कर्मचाऱ्यावर हल्ला

नाशिक : शहरात रोज हाणामारीच्या घटना समोर येत असतात.रोजच विविध कारणातून हाणामारी होत असतात.आणखी एक हाणामारीचा प्रकार सातपूर मध्ये घडला आहे. निमित्त फक्त भंगार न दिल्याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.भंगार व्यवसायिकाने घंटागाडी चालकाला मारहाण केली आहे . घंटागाडीवर जमा होणाऱ्या भंगारची आपल्याला विक्री का करत नाही ? असा जाब विचारत घंटागाडी चालकाला सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील भंगार व्यावसायिकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

शहरातील घंटागाडीवर अनेक नागरिक कचऱ्यातून भंगार मध्ये विक्री होणाऱ्या वस्तू देत असतात त्यामुळे घंटागाडी वर असलेले कर्मचारी त्या वस्तू भंगारात विकत असतात. आणि त्यातून मिळणाऱ्या पैशात ते आपापसात वाटून घेत असतात. लोखंड प्लास्टिक पृष्ठे काचेच्या बॉटल यासारख्या वस्तू जमा करून भंगार व्यवसायिकांना देत असतात घंटागाडीवर जमा होणारा भंगार माल मला का विक्री करत नाही ‘ या कारणावरून श्रमिकनगर येथील साजन अन्सारी या भंगार व्यावसायिकाने घंटागाडी कर्मचारी चेतन भुजबळ यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार सातपूर पोलिसांत देण्यात आली आहे .


मात्र पोलिसांनी संबंधितावर कारवाई न केल्यामुळे दुसऱ्यांदा मारहाण करण्यात आल्याचा आरोप घंटागाडी कर्मचाऱ्याने केला आहे .
या अगोदर देखील शहरात घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांची हमरी तुमरी झाली आहे कर्मचाऱ्यांवर दमदाटी हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. आता देखील भंगार न दिल्याच्या वादातून एका भंगार व्यवसायिका घंटागाडी कर्मचाऱ्यालाच मारहान केली आहे.