सुरगाणा तालुक्यातील आश्रम शाळेत पाचवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यातील (Suragana Taluka) शिंदे दिगर येथील आश्रम शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या (Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनिता भोये (Anita Bhoye) अस या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शिंदे दिगर येथील गिरीजादेवी प्राथमिक आश्रम शाळेत (Ashram school) शिकत होती. शनिवारी (दि.०१) सकाळी सहा ते सातच्या आत्महत्या केल्याची माहिती आहे. आश्रम शाळेच्या भोजनालयाच्या ओट्यावर नायलॉन दोरीने गळफास घेत जीवन संपविले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक अनिल सोनवणे यांनी घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना (Surgana Police) दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात (Surgana Rural Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवला.

संबंधित मृत विद्यार्थिनीवर शनिवारी दुपारी वाघ धोंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.