नाशिक : महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८ त्याचप्रमाणे आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी पालिकेने पत्र व्यवहार सुरू केला आहे (The municipality has started correspondence for the recruitment process). टीसीएस आणि आयबीपीपीएस या दोन कंपन्यांमार्फत (TCS and IBPPS companies) प्रस्ताव आल्यानंतर दोनपैकी एका कंपनीची निवड केली जाणार आहे.
महापालिकेत (Nashik Municipal Corporation) गेल्या २४ वर्षांपासून नोकर भरती झाली नाहीये. ‘क’ संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ वर असताना सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली आहे. पालिकेत सध्याच्या स्थितीमध्ये जेमतेम ४५०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. अजून अडीच हजार पदे रिक्त आहे. पस्तीस टक्के आस्थापन खर्च असल्यास नोकर भरतीला अडचण आहे.
नगरविकास विभागाने (Department of Urban Development) सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ७७५ नवीन पदांना नगर विकास विभागाकडे मंजुरी दिली होती. मात्र २०१७ पासून पालिकेची सेवा प्रवेश व नियमावलीची फाईल मंत्रालयात मंजुरी अभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेर आता नगर विकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदं आणि आरोग्य त्यासोबतच वैद्यकीय विभागातील ३५८ पदक असे एकूण ७०६ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे आता पालिकेने दोन कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रिया (Recruitment in Nashik Municipal Corporation) संदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट केले आहे.
सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने सध्या ७०६ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित २००० पदांसाठीचीही प्रलंबित असलेली सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यास संबंधित दोन हजार पदे भरता येतील.
टीसीएस किंवा आयबीपीपीएसमार्फत भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब , क, ड या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस,Tata Consulting Services), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, Institute of Banking Personnel Selection) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित केलेला आहे. हा आदेश महापालिकेला प्राप्त (Government decision issued order received by the Municipal Corporation) झाला आहे. त्यामुळे महापालिका या ७०६ पदांसाठीच्या नोकरभरतीसाठी या दोन संस्थांपैकी एका संस्थेची निवड करणार आहे.