गोपीचंद पडळकरांचा पवार कुटुंबावर नाशकातून हल्लाबोल

नाशिक : गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांना लक्ष्य करत तिखट शब्दांत टीका केली आहे. ‘काका पुतणे यांची राज्यात एकच टोळी असून बिबट्या इथे निघतो आणि १००० कोटी निधी बारामतीला जातो असा आरोप पडळकरांनी केला. तर ‘पैसे खान्देशाचे, विकास त्यांचा..तुमच्याकडे तिजोरी दिली म्हणून सगळी गडप करू नका..आमच्या गावच्या मेंडक्याला जरी चाव्या दिल्या तरी तो विकास करून दाखवेल असा जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान नाशिकमध्ये बोलताना पडळकरांनी राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला. ‘राष्ट्रवादी पक्षाबद्दल न बोललेलं बर. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याच पहायचं वाचून असं त्याचं आहे. ओबीसी लीडर म्हणता मग त्या घटकांचा विचार केला का..? आमचं सरकार त्यांच्याकडे बघत आहे..’असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवरला १ मॅच खेळायला लावा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रोहित पवार यांची सदस्य पदी निवड झाली मग त्यांची अध्यक्षपदावरही निवड करण्यात आली. यावर बोलताना ‘पवार हे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कुस्ती खेळली ? अजित दादा कबड्डी चे अध्यक्ष आहेत, त्यांनी कबद्दडी खेळली का ? सुप्रीया सुळे खो खो अध्यक्ष होत्या, त्या कधी खेळल्या का..? रोहित पवार क्रिकेट चा अध्यक्ष, त्याला क्रिकेट खेळता येते का ? रोहित पवरला १ मॅच खेळायला लावा..५-१० रन केले तर ठेवा’, असं म्हणत पडळकरांनी रोहित पवारांना डिवचलं.

संजय राऊत..काहीही बोलतात

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत.. हे काहीही बोलत असतात. अशा लोकांना उत्तर द्यायला मला वेळ नाही..उद्धव सेनेला कुबड्यांची गरज तर भाजपाला लोकांचा पाठिंबा आहे’ असे टीकास्त्र पडळकरांनी डागले.

ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य..

ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य असल्याचं म्हणत पडळकरांनी छगन भुजबळांच्या सुरात सूर मिळविले. आपल्याकडे देखील बिहार प्रमाणे मोजणी झाली तर वाईट काहीच नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. यामुळे सगळ्या समाजाला कळेल की नेमकी संख्या किती आहे. ओबीसींचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत..असा दावा त्यांनी केला.