राज्यपाल कोश्यारी नाशिकमध्ये, राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंग कोशारी शनिवारी नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नाशकात दाखल होणार आहेत.

राज्यपाल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नाशिक शाखेचे सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात उपस्थित राहणार असून सकाळी कालिदास कलामंदिर येथे होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विकास उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता एस एस के वर्ल्ड येथे होणारे अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यानंतर राज्यपाल सिन्नरच्या गारगोटी संग्रहालयला भेट देणार असून नंतर सोयीने मुंबईकडे प्रयाण करतील. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या यापूर्वीच्या दोन दौऱ्यात राजकीय जुगलबंदी चांगलीच चर्चेत आली होती. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १२ आमदारांच्या निर्मितीचा प्रश्नांवर राज्यपालांकडून होत असलेल्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल येत असल्याने व त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते, मंत्रीही कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने राजकीय जुगलबंदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपाल यांचे निमित्त राजशिष्टाचाराचा भाग म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ही नाशकात दाखल होत आहेत.