पॉकेटमनीला विरोध केला म्हणून आजी-आजोबांना संपवलं

नाशिक : कळवण (Kalwan) तालुक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. या हत्येचा उलगडा झाला आहे. मयत वृध्द दाम्पत्याच्या नातवाला या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. कुऱ्हाडीचा घाव घालत अत्यंत निर्दयीपणे ही हत्या करण्यात आली होती. या घटनेन कळवण सह संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता.

नाशिक शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी कळवण तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीचा घाव घालत निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत खुनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयातून दाम्पत्याच्या नातवाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत शहाजी काळू कोल्हे याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आपणच आजी-आजोबांचा खून केला असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पॉकेटमनीला विरोध म्हणून आजी-आजोबांना संपवलं..

रात्री उशिरापर्यंत शहाजी काळू कोल्हे याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आपणच आजी-आजोबांचा खून केला असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. कबुली जबाबात वृद्ध दाम्पत्याकडून वेळोवेळी खर्चासाठी पैसे दिले जात नाहीत (Grandparents killed for opposing pocket money), तसेच भेदभाव करतात याचा राग डोक्यात ठेवत त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याची कबुली सदर संशयिताकडून देण्यात आल्याचं अभोणा पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील वेरूळे गावात राहणाऱ्या वयोवृध्द नारायण मोहन कोल्हे व त्यांची पत्नी सखुबाई कोल्हे यांचा कोणीतरी अज्ञात संशयिताने डोक्यात कु-हाडीने वार करून खून केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. दुहेरी खूनाच्या गुन्हयाचा गांभीर्याने तपास सुरू करून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग निफाड तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर पथकासोबत फॉरेंन्सीक टिम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विष्लेशण पथक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच तात्काळ तपास सूरू केला होता.

पोलीस खाक्या दाखविताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित वृध्द दाम्पत्याचा नात्याने नातु असून त्याला वेळोवेळी खर्चाला पैसे म्हणजेच पॉकेटमनी दिली नाही, त्याच्याशी नेहमी भेदभाव करतात या कारणावरूनमनात राग धरून त्यांचा खून केल्याची त्याने दिली आहे.