नाशिक । प्रतिनिधी
नवसाला पावणारा गणपती म्हणून नाशिकच्या नवश्या गणपती (Nashik Navashya Ganpati) मंदिरात आज अंगरिका चतुर्थी (Angaraki Chaturthi) निमित्त द्राक्षांची आरास (Grapes Decoration) करण्यात आली असून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
कोरोनाच्या निर्बंधांमधून (Nashik Corona Crisis) मुक्ती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. त्यामुळं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्याचंच औचित्य साधून नवसाला पावणारा गणपती म्हणून नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आज अंगरिका चतुर्थी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली असून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गणरायाच्या व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं (Sankashti Chaturthi) व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यातही संकष्टीला मंगळवार आल्यास हा योगायोग अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) होतो. यंदा अशीच अंगारकी संकष्टी चतुर्थी १९ एप्रिल २०२२ दिवशी आहे. संकष्टी आणि अंगारक योग वर्षात क्वचितच येत असल्याने गणेशभक्तांमध्ये या दिवशी विशेष स्वरूपात गणपती बाप्पाची पूजा-अर्चना केली जाते. मंदिरात जाऊन आणि घरगुती स्वरूपातही भक्त मंडळी मोठ्या जल्लोषात पण तरीही भक्तिमय वातावरणामध्ये हा दिवस साजरा करतात.
नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आज अंगरिका चतुर्थी निमित्त भाविकांनी मंदिरात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी द्राक्षांची आरास मोठी खुलून दिसत होती. या आरास मध्ये हिरवे आणि काळया द्राक्षांचा समावेश करण्यात आला आहे. मंदिरातील गाभार्याला ही द्राक्षांची सजावट करण्यासाठी १५१ किलो द्राक्ष वापरण्यात आले आहेत. चतुर्थी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात.