नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्व विद्या शाखांच्या पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील 166 परीक्षा केंद्रांवर सुरू झाले आहेत .यात नाशिक मधील दोन वैद्यकीय दोन दंत वैद्यकीय चार आयुर्वेद दोन युनानी तीन होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये या परीक्षा होत आहेत राज्यभरातून परीक्षेसाठी पदवी अभ्यासक्रमाचे 41226 आणि पदव्युतरपदवी अभ्यासक्रमाचे पाच हजार 100 विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत सध्या राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे पुराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते उपाययोजना करण्यासंदर्भात यापूर्वीच परीक्षा केंद्रप्रमुखांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आली होती अशी माहिती मिळाली आहे दरम्यान पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्या शाखा तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दंत आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी व तत्सम विद्याशाखांच्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 4 ऑगस्ट 22 पर्यंत होणार आहेत राज्यभरातून या उन्हाळी सत्र परीक्षांसाठी 46 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत .