हृदयद्रावक ! १०वीचे विद्यार्थी पेपरसाठी निघाले मात्र रस्त्यातच मृत्यूने गाठलं

नाशिकः आज पासून दहावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली आहे. अशातच नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असताना रस्त्यातच दहावीच्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. दहावीचे पेपर देण्यासाठी जात असताना दोघा विद्यार्थ्यांना गॅसच्या ट्रकने धडक दिली (Two students were hit by a gas truck). ट्रक खाली चिरडल्याने दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील आगसखिंड येथील रहिवासी असलेले शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र १० वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्राकडे निघाले होते (Accidental death of two students while going to give their 10th paper). पांढुर्ली येथिल जनता विद्यालय (Pandhurli Janata Vidyalaya) या केंद्रावर त्यांचा पेपर होता. ते पेपर देण्यासाठी आपल्या ऍक्टिव्हा या दुचाकीवरून जात असताना आगसखिंड येथे भरधाव वेगात येणाऱ्या एच.पी गॅसच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

सिन्नर घोटी हायवेवर आगसखिंड (Sinner Ghoti Highway Agashkhind Shiwar) शिवारात सकाळी दहाच्या सुमारास एचपी गँस टँकर आणि अँक्टिवा यांचा भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुले जागीच ठार झाले. आज दहावी बोर्डाचा पहिलाच पेपर असून पेपर देण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभम रामनाथ बरकले व दर्शन शांताराम आरोटे (वय १६) हे दोघे मित्र आज (दि. २) असे या दोघा मित्रांचे नाव असून ते दहावीचा पेपर असल्याने अँक्टिवा घेऊन जनता विद्यालय पांढुर्ली येथे पेपर देण्यासाठी निघाले होते. मात्र गावाच्या काही अंतर पुढे गेल्यावरचं त्यांच्यावर काळाने झडप घातली. डी. एड कॉलेजसमोर त्यांची गाडी गॅस ट्रकला धडकली आणि दोघे मित्र जागेवरच ठार झाले.

दरम्यान , सिन्नर तालुक्यातील आगसखिंड येथील विद्यार्थी पेपर देण्यासाठी पांढुर्ली येथील शाळेत येत होते. परंतु त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे आगस्टखिंड परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. दोन्ही दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दहावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी मृत्यू झाल्याने हळ हळ व्यक्त केली जात आहे.