पंढरपुर : पंढरपुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. छत्तीसगड राज्यातून बांधकाम मजूर म्हणून पंढरपुरात आलेल्या तीन तरुणांचा रेल्वे खाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेमलाल गोविंद ठाकूर ( 30, रा. खजरी ता. खैरागड , जि.राजनांदगाव छत्तीसगड ) पंकज रामचरण मिरवी ( २३ , रा . बिरखा , पो . गंडई , जि . राजनांदगाव , छत्तीसगड ) व सोनू तुलाराम यादव ( १८ , रा . जि . राजनांदगाव , छत्तीसगड ) अशी मृत तिघांची नावे आहेत . तर गोकुळ फुलसिंग भिरवी २० , रा . बिरखा गंडई ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार आहेत . सुरू ही घटना रेल्वे स्थानक ते लक्ष्मी टाकळी मार्गावरील पूल दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड राज्यातून ती इथे आले होते कराड नाका परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ते राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा सर्वजण येथील रेल्वे स्टेशन पासून थोड्या अंतरावरील रुळावर बसले होते . पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेचा अंदाज त्यांना आला नाही त्यातच धावत्या रेल्वेखाली सापडून दोन जण चिरडले गेले. तर यातील दोन जण रेल्वेच्या धडकेने बाजूला उडाले त्यामुळे ते दोघी गंभीर जखमी झाली त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चौफुले कुर्डूवाडी रेल्वे पोलीस निरीक्षक पालवी काळे , संजय चिटणीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली रेल्वे पोलिसांनी पंचनामे करून मृत व जखमीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवले मृत तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून जखमीला येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.